Select Page

अ‍ॅड.निशा शिवूरकर

सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार : प्रबोधन २०१८ 

निशा शिवूरकर हे लोकशाही समाजवादी व स्त्रीवादी चळवळीतील एक आश्वासक नाव आहे. मागील सुमारे 38 वर्षे निशाताई सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपलेकार्य, वक्तृत्व व लेखन यांद्वारे त्यांनी मराठी विचार विश्वात महत्वाची भर घातली आहे. निशाताईंचे सर्वात महत्वाचे योगदान आहे ते परित्यक्तांच्या प्रश्नावरचे. सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड व वकिलीच्या व्यवसायाचा अनुभव यातून त्यांनी परित्यक्तांच्या प्रश्नावर अभ्यास व काम सुरू केले. अशाप्रकारचे देशातले हे पहिलेच काम. 1988 साली त्यांच्या पुढाकाराने देशातली पहिली परित्यक्ता परिषद संगमनेर येथे झाली. या परिषदेमुळे समाज व शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. 1990 साली या प्रश्नावर निशाताईंच्या नेतृत्वाखाली समता आंदोलनाने पुणे ते मुंबई दरम्यान परित्यक्ता मुक्तीयात्रा’ काढली. 1991 मध्ये मुंबईला विधानसभेवर 1500 परित्यक्तांचा मोर्चा नेण्यात आला. 1988 ते 1992 दरम्यानची पाच वर्षे या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्रात रान उठवले. समता महिला पतसंस्थाही परित्यक्ता व अंगणवाडी कर्मचार्‍यांची पतसंस्था त्यांनी 1993 मध्ये स्थापन केली. त्यामुळे अनेक स्त्रियांना आर्थिक आधार मिळाला व आत्मसन्मानही.1994 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी परित्यक्ता हक्क परिषदेच्या त्या निमंत्रक व संयोजक होत्या. या परिषदेला 50,000 स्त्री-पुरुष उपस्थित होते.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- अ‍ॅड.निशा शिवूरकर