Select Page

हरी नरके

वैचारिक योगदानासाठी विशेष पुरस्कार २०१८

१९९० च्या दशकात फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि संस्थात्मक व शासकीय पातळीवर त्याप्रमाणे निर्णय घडून येणे ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली . त्या प्रक्रियेला गती देण्यामध्ये ज्या  अभ्यासकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यात हरी  नरके यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागते. महाराष्ट्र  शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला,  त्याचे संपादक हरी नरके आहेत.  आणि डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन  हरी नरके यांनी केले आहे. शिवाय, फुले व आंबेडकर यांचे हे सर्व लेखन हिंदी व इंग्रजीत अनुवाद करण्याच्या  प्रकल्पातही प्रा नरके यांचा सहभाग राहिला आहे.  हरी नरके सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत . लेखणी व वाणी या दोन हत्यारांच्या साह्याने ते मागील ३० वर्षांपासून प्रबोधनाचे काम करीत आहेत. लहान मोठे अशा  दोन डझन पुस्तकांचे लेखन वा  संपादन त्यांनी केले आहे. वाय ४०० पेक्षा अधिक लेख  विविध वादांच्या निमित्ताने त्यांनी लिहिले आहेत आणि पाच हजारांपेक्षा अधिक व्याख्याने देशा-विदेशात दिली आहेत. मराठी , हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमधून त्यांनी हा विचार जागर चालवला आहे.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- हरी नरके