Select Page

मतीन भोसले

सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०१८ : संघर्ष  

कुठल्या तरी ओसाड माळरानावर चाकर तुरट्याच्या ढोपडीत राहणाऱ्या फासे पारधी समाजातल्या मुलां-मुलींसाठी मतीन भोसले यांनी ‘प्रश्नचिन्ह’ही आश्रमशाळा काढली. मतीन भोसले हे अमरावती जिल्ह्यातले. त्यांच्या या शाळेत सध्या पहिली ते दहावीपर्यंतची मुले-मुली मिळून एकूण ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फासेपारधी मुलांच्या हातातील भिकेचा कटोरा आणि लुटमारीची साधने सोडून द्यायला आणि शिक्षण घ्यायला भोसले यांनी त्यांना उद्युत केले. मतीन भोसले यांच्यासारख्याध्येयवेड्या शिक्षकामुळे वंचित घटक मुख्य प्रवाहात येण्यास मोलाची मदत झाली.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- मतीन भोसले