Select Page

प्रा . एन. डी. पाटील

महाराष्ट्र फाउंडेशन विशेष गौरव पुरस्कार- २००७ 

दि. २७ ऑक्टोबर २००७चा दिवस, वेळ दु. २-२.३०ची. स्थळ रयत शिक्षणसंस्थेच्या सातारा येथील मध्यवर्ती कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीची खोली. डॉ. सुबोध वागळे सांगत होते की, नीरा-देवधर धरणाचे काम जवळ जवळ ९०% पूर्ण झाले आहे. पैशाअभावी १०% उर्वरित काम बांधा-वापरा तत्त्वावर द्यायचे घाटते आहे. एवढे ऐकताक्षणीच एक निश्चयी, गंभीर पण जोशपूर्ण आवाज आला, “असे असेल तर हा प्रश्न हातात घ्यायला हवा. तुम्ही परिषद बोलवा, मी तुमच्या बरोबर येतो.” हा आवाज होता महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या व नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलेल्या अफाट ऊर्जेचा. या ऊर्जेचं नाव अर्थातच एन. डी. पाटील.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे