Select Page

प्रवीण बांदेकर

ग्रंथ पुरस्कार २०१८

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही प्रवीणबांदेकर यांची दुसरी कादंबरी आहे. या पूर्वी त्यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. तळकोकणातील समाजजीवन आणि राजकीय सत्तेचे दमनकारी स्वरूप हा संघर्ष बांदेकर यांनी ‘चाळेगत’ या कादंबरीत मांडला होता. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही कादंबरी समकालीन वर्तमानाला दिलेला प्रतिसाद आहे.‘उजव्या सोंडेच्या बाहल्या’ ही कादंबरी आजच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील अमानवी प्रवृत्तीचा वेध घेते. व्यक्तीला कळसूत्री बाहुली बनवून धार्मिकतेचे रूपांतर धर्मांधतेत करायचे याचे पद्धतशीर कारस्थान कसे रचले जाते, याचा दंगस्फोट या कादंबरीत होतो. धर्मसत्तेचे षड्यंत्र, सामान्य माणूस, दहशत माजवणारे धर्मरक्षक या समकालीन सामाजिक पर्यावरणाला लेखकाने फॅन्टसीच्या अंगाने चित्रित केले आहे. धार्मिक संस्थांच्या कारवाया, यात विवेकाचा दिला जाणारा बळी, धर्मसत्ता आणि राजसत्तेचे हितसंबंध, बुद्धिजीवी वर्गाने अशा पर्यावरणात हस्तक्षेप करण्याऐवजी भौतिक सुखांच्या चंगळवादात स्वत:ला गुरफटवून घेणे इत्यादी बाबी या कादंबरीतून तीव्रपणे दिसून येतात.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेता ग्रंथ 

 

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- प्रवीण बांदेकर