Select Page

पंजाबमधील तर्कशील सोसायटी

डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१८

महाराष्ट्र फौंडेशन ( अमेरिका ) यांच्या वतीने दिला जाणारा २०१८ चा डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार पंजाबमधील तर्कशीलसोसायटीला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहेमागील ३५ वर्षांपासून  तर्कशील सोसायटी पंजाबमध्ये कार्यरत असून , अंधश्रद्धा निर्मूलन , कालसुसंगतधर्मचिकित्सा  व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे कार्य या सोसायटीमार्फत केले जाते. विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण व धर्म यांना अलग ठेवले पाहिजे अशी भूमिका तर्कशीलने सुरुवातीपासून घेतली आहे. .पंजाबमधील बर्नाला या जिल्ह्याच्या ठिकाणी तर्कशीलसोसायटीचे मुख्यालय आहे. पंजाबमधील  सर्व २२  जिल्ह्यात मिळून तर्कशीलच्या ८० शाखा असून, दोन हजाराहून अधिक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले आहेत. हरियाणा, हिमाचल प्रदेश , राजस्थान व  दिल्ली या राज्यांमध्येही तर्कशीलच्या काही शाखा कार्यरत आहेत.  या सोसायटीच्या वतीने ‘तर्कशील’ हे  नियतकालिक  पंजाबी भाषेतून प्रकाशित  होते तर  ‘तर्कशील पथ ‘ हे  नियतकालिक हिंदी भाषेतून प्रकाशित होत असते.पन्नासहून अधिक पुस्तके तर्कशीलने प्रकाशित केली आहेत. लेख , मुलाखती, व्याख्याने , चर्चासत्रे , परिषदा , नाटक , जादूचे प्रयोग इत्यादी माध्यमातून विवेकी जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करीत असतानाच ज्योतिषी व भोंदू बुवांचे ढोंग उघडे पाडण्याचे कामही  तर्कशील सोसायटी करीत आली आहे. भानामतीचा  शोध आणि मानसिक आरोग्य केंद्र हे कामही केले जाते. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र फौंडेशनने डॉ दाभोलकर स्मृती पुरस्कारदेण्यास सुरुवात केली. भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षाता, विवेकवाद यांची रुजवणूक आणि परिवर्तनाच्या चळवळीला  साह्यभूत ठरलेल्या व्यक्ती वा संस्थाना हे पुरस्कार देण्याचा निर्णय फौंडेशनने घेतला.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- पंजाबमधील तर्कशील सोसायटी