Select Page

राजीव नाईक

रा.शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार २०१८ 

राजीव नाईक हे आधुनिक मराठी रंगभूमीवरचे एक सतेज सर्जनशील नाटककार अशी राजीव नाईकांची ओळख आहे. सततची नाटकं’, ‘मधली नाटकं’, ‘आताची नाटकं’, ‘बंदिश’, ‘मागोवा’ (चेतन दातार यांच्यासह अनुवादलेले), ‘मातीच्या गाड्याचे प्रकरण’ (शूद्रकाच्या ‘मृच्छकटिकम्’चे रूपांतर), ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ (शेक्सपियरच्या ‘मिडसमर नाईट ड्रीम्स’ चा अनुवाद) अशी त्यांची नाट्यसंपदा आहे. मानवी नातेबंधांचे अत्यंत मूलगामी भान मांडणारी आणि जगण्याच्यासतत उत्क्रांत होत जाणार्या भोवतालात उकलत जाणारे जीवन समजू घेऊ पाहणारी नाटकं राजीव नाईकांनी लिहीलेली आहेत.मानवी जीवनाला व्यापून राहणाच्या काळतत्त्वाचा विचार त्यांच्या नाट्यलेखनात विरघळून आलेला असतो. मानवी नात्यातल्या सूक्ष्म राजकारणाचा अन्वयही ते आपल्या नाटकांमधून लावू पाहतात. त्यांची जीवनविषयक भूमिकाही सातत्याने आधुनिक आणि पुरोगामी राहिलेली आहे. मृच्छकटिकम’च्या त्यांनी केलेल्या रूपांतरावरून आपल्याला हे समजून येते.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

 

 

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- राजीव नाईक