Select Page

सानिया

वाङ्मयप्रकार पुरस्कार २०१८ – कथा

कथनात्म साहित्यात केवळ स्त्रियांच्याच लेखनात नव्हे तर एकूण मराठी साहित्यात सानिया यांचे लेखन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 1975 पासून मराठी साहित्यात त्यांनी त्यांचा खास वाचक निर्माण केलेला आहे. त्यांचे ‘शोध’ (1980), ‘प्रतीती’ (1989), ‘दिशा घराच्या’ (1991), ‘ओळख’ (1992), ‘भूमिका’ (1994), ‘वलय’ (1995),’ प्रयाण’ (1997) यांसारखे त्यांचे अनेक कथासंगह प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी मोजक्या  संग्रहांची नोंद केली असली, तरी आणखीही त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘स्थलांतर’ (1994), ‘आवर्तन’ (1997),’ अवकाश’ (2001) या त्यांच्या तीन कादंबर्‍याही प्रसिद्ध आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी या साहित्य प्रकारात लक्षणीय तरीही प्रयोगशील अशी निर्मिती त्यांनी केली आहे. सानिया यांच्या बहुतेक कथा स्त्रीकेंद्री असल्या तरीही त्या कथांना केवळ या चौकटीत बंदिस्त करता येत नाही. लिहिण्यामागची त्यांची धारणा अतिशय स्पष्ट आहे. ‘‘… बाई म्हणून जगलेल्या आयुष्याचे आकलन आणि जोपासलेल्या संवेदना सतत तीव्रच राहाव्यात अशी इच्छा असते…

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

 

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८ – सानिया