Select Page

शांता गोखले

साहित्यः जीवनगौरव पुरस्कार २०१८

शांता गोखले या नावाजलेल्या पत्रकार आणि रंगभूमीच्या इतिहासकारही आहेत. त्यांनी १८४३ ते २००० पर्यंतच्या मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिलेला आहे. कोणत्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमी आकाराला आली, याचाही वेध त्यांनी घेतला आहे. अनुवादक म्हणून, संपादक म्हणून, त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व थक्क करणारं आहे. स्मृतिचित्रे (लक्ष्मीबाई टिळक) ते ‘अच्युत आठवले आणि आठवण’ (मकरंद साठे), गोडसे भटजींचा माझा प्रवास ते सतीश आळेकरांचं ‘बेगम बर्वे’ अशा एकाच वेळी अभिजात आणि आधुनिक ग्रंथांचा अनुवाद करण्याचं त्याचं कौशल्य निश्चितच दाद देण्याजोगं आहे.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१८- शांता गोखले