Select Page

अजित दळवी

रा. श. दातार नाट्य पुरस्कार २०१७ : समाजस्वास्थ्य

नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ९८२२८८४३७६

र. धों. कर्वे यांच्यासारखा एक बुद्धिप्रमाण्यवादी माणूस लॆंगिक स्वातंत्र्याच्या प्रश्नावर टोकाला जाऊन विवेकवादाचा लढा उभारतो. त्यांच्यावर खटल्यांमागून खटले भरले जातात. परंतु ते आपल्या तत्वापासून मागे हटत नाहीत. त्यांच्यावरील तीन खटल्यांच्या निमित्ताने अजित दळवी यांनी त्यांच्या बुद्धिप्राण्यवादाचा प्रवास अजित दळवी यांनी ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकातून पुढे आणला आहे. आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनेक प्रश्नांशी हे नाटक नाते सांगते. अजित दळवी हे संवेदनशील नाटककार म्हणून नावाजले जातात. औरंगाबाद येथील हौशी रंगभूमी पासून ते महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा असा त्यांचा सुरुवातीला प्रवास झाला. आणि त्या नंतर ‘दिशांतर’, ‘नाटयांग’, ‘परिवर्तन’ संस्थांच्या माध्यमातून वेगळया धाटणीची नाटके दळवी यांनी लिहिली. औरंगाबादेत प्राध्यापकी, युक्रांद चळवळीतील कार्य करतानाच नाटकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नसे. ‘मुक्तिधाम’, ‘शतखंड’, ‘देहधून’, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, ‘गांधी विरूद्ध गांधी’ अशा नाटकांमधून त्यांनी सामाजिक प्रश्नांचा वेध घेतला. त्यांच्या काही नाटकांचा हिंदी, इंग्रजीत अनुवाद झालेला आहे. ‘समाजस्वास्थ’ नाटकातून र.धो. कर्वे यांचे सामाजिक कार्य प्रभावीपणे मांडले. कथानकांच्या अंगाने जाणारी तर्कशुद्ध विवेकवादी भूमिका प्रभावीपणे मांडणारे अजित दळवी हे महत्त्वाचे नाटककार आहेत. साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१७- अजित दळवी