गंगाधर मोरजे
विशेष पुरस्कार लोकसाहित्याचे अभ्यासक – २००१
डॉ. गंगाधर नारायण मोरजे यांच्या एकूण लेखनाकडे वरवर जरीं नजर टाकली तरी लक्षात येते की, त्यांचा कल अधिकतर ‘लोकसंबंधी’ आहे. उदा. ‘मराठी लावणी वाङ्मय’, ‘शाहीर वरदी परशराम’, ‘लोकसाहित्य : आकलन आणि आस्वाद’, ‘लोकसाहित्य क्षेत्रीय अभ्यास’: लोकसाहित्य : सिद्धान्त-रचनाबंध’,’लोकसाहित्य, एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र’,’ लोकसंबंध’ उदाहरणे तरी किती द्यावी?या स्वतंत्र ग्रंथाबरोबर डॉ. मोरजे यांनी लिहिलेल्या अनेक शोध-निबंधांचे स्वरूपहि त्यांच्या ग्रंथांसारखेच आहे
