राम संपत दोतोंडे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००१
राम दोतोंडे हे नाव दलित कवितेमध्ये खास स्थान मिळविलेले नाव आहे. दलित कवितेत जी विविधता आली त्याला कारणीभूत असलेले जे कवी आहेत त्यात रामचा क्रमांक बराच वरचा लागतो. अतिशय नम्र, दुसऱ्याचं मत समजून घेणारा, मतभेद मान्य करून माणसांवर प्रेम करणारा असा हा कवी आहे.
