Select Page

मनोहर कदम

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २०००  

मनोहर कदमच्या मृत्यूचा सर्वांनाच चटका लागून राहिला. त्याला मृत्यूने अवेळी गाठलं. याची तर खूप रुखरुख लोकांना लागली. अठेचाळीस वर्षाचं वय हे काही मृत्यूचं वय नाही. मृत्यूला वयोमर्यादेचं कुठलंही बंधन नसलं, तरीही परिपूर्ण आयुष्य जगण्याची आपली जी कल्पना आहे, त्याच्या अर्ध्यावरच मनोहर गेला. खरं तर हे वय एका परिपक्वतेकडं झुकत जाणारं असतं. सर्वच पातळ्यांवरचे अनुभव गाठीशी असतात. माणसं पाहिलेली असतात.

अंकातील मुलाखत वाचा

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे