डॉ. म्हसकर
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१
महाराष्ट्राला सेवाभावी कार्यांची मोठी परंपरा आहे. डॉ. बाबा आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. रजनीकांत आरोळे अशी अनेक नावं सांगता येतील. या परंपरेत आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो डॉ. प्र. रा. तथा आप्पासाहेब म्हसकर यांचा. खून, मारामाऱ्या, बलात्कार, लैंगिक शोषण, भ्रष्टाचार यांचं प्राबल्य असणाऱ्या या वातावरणात ‘डॉ. म्हसकर वैद्यकीय प्रतिष्ठान’सारख्या संस्थेचं कार्य अधिक महत्त्वाचं ठरतं.
