Select Page

अरविंद गुप्ता

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार २०१७

विज्ञान प्रसारक
पत्ता –
संपर्क – मो. ७३५०२८८०१४

अरविंद गुप्ता म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे, त्यांनी विज्ञानाची गोडी लावणारे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व . महाराष्टÑातील शाळा शाळांमध्ये ते ‘वैज्ञानिक खेळण्यांचा जादूगार’ म्हणून चांगलेच परिचित आहेत. अगदी छोटया छोटया प्रयोगातून विज्ञानाचे तत्त्व सांगत गुप्ता मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न करतात. कानपूर आयआयटी तून त्यांनी इंजिनिअरिंग पदवी घेतली. विज्ञान विषयक अभ्यासक डॉ. अनिल सद्गोपाल यांच्याशी त्यांचा परिचय झाला. यातून त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञान विषय नुसताच शिकवला नाही तर मुलांना त्याची गोडी लावण्यात ते यशस्वी झाले. अशातच प्रयोग म्हणून विज्ञानाची खेळणी बनवण्याचे काम त्यांनी हाती घेतले. डॉ. जयंत नारळीकर यांनी २००३ मध्ये आयुका संस्थेतील विज्ञान विषयक केंद्रात गुप्ता यांना मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या कार्यात सहभागी करुन घेतले. येथे त्यांच्या प्रयोगशीलतेचे क्षितीज विस्तारले. टाकाऊ वस्तूंमधून कल्पकतेने खेळणी बनविण्याचे त्यांचे कार्य थक्क करणारे आहे. भारतातील ३००० शाळांमधून कार्यशाळा घेत त्यांनी मुलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन दिले. विविध पंचवीस देशातील शिक्षक -विद्यार्थी प्लास्टिकच्या बाटल्या, रद्दी पेपर, स्ट्रॉ, रिकामी पाकिटे, डबे, बाटल्यांची बूचं, थर्माकोल, टायर, तुटलेल्या चपला अशा साधनांमधून गुप्तांच्या मागदर्शनाखाली वैज्ञानिक खेळणी बनवू लागले. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेली ‘टाकाऊतून शिकाऊ’, ‘खेळण्यांचा खजिना’, ‘छोटी खेळणी मोठे विज्ञान’ आदी अनेक पुस्तके वाचनीय व अनुकरणीय आहेत.त्यांच्या ‘खेल खेल में’ हे या विषयावरील पुस्तकाच्या एक लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. तर १३ भाषांमध्ये ते पुस्तक अनुवादित झालेले आहे.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१७ – अरविंद गुप्ता