भास्कर चदनशिव
महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३
एकोणीसशे सत्तरच्या आसपास औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाने अण्णा भाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ J आयोजित केलेल्या कथा लेखनस्पर्धेत भास्कर चंदनशिव यांची मसणवाटा’ कथा पहिलीआली. सुरुवातीच्या काळात ‘अस्मितादर्श’ या गंगाधर पानतावणे यांच्या नियतकालिकात त्यांच्या कथा यायला लागल्या. दलित साहित्याच्या प्रांतात भास्कर चंदनशिव यांचे नाव महत्त्वाचे गणले जाऊ लागले. एकोणीसशे ऐंशी साली त्यांचा ‘जांभळ ढव्ह’ हा कथासंग्रह ‘लोकवाङमय गृह’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला. तेव्हा प्रकाशकांनी ‘आजच्या व उद्याच्या महाराष्ट्राचा एक समर्थ दलित लेखक’ म्हणून त्यांचे स्वागत केले. दोन हजार दोन सालचा दलित साहित्याच्या क्षेत्रातील महाराष्ट्र फाउण्डेशन विशेष पुरस्कार दत्ता भगत यांना आणि दोन हजार तीन सालचा ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रातील तोच पुरस्कार भास्कर चंदनशिव यांना जाहीर व्हावा हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
