
गंगाप्रसाद अग्रवाल
समाजकार्य जीवनगौरव २०१७
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९४२१८०४५८१
गंगाप्रसाद अग्रवाल यांनी राष्टसेवा दल, सर्वोदय चळवळ व कृषिप्रधान कार्याला आपलं आयुष्य समर्पित केलं. स्वतंत्रता लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम अशा लढयात सक्रीय सहभाग नोंदवला. बाबासाहेब परांजपे या शिक्षणव्रतीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. महात्मा गांधींच्या १९४२ च्या ‘चले जाव’लढयात ते सामील झाले. पुढे अस्पृश्यता निवारण, बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजजागृतीसाठी नवनवीन कल्पना राबविल्या. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सहभागामुळे जनसामान्यात परिचीत झाल्यामुळे निकटवर्तीयांच्या सांगण्यावरुन त्यांनी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष ही जबाबदारी सांभाळली. पण राजकारण हा मुळचा पिंड नसल्याने व सेवादल तसेच विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी राजकारणाला पूर्णविराम दिला. आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीत स्वत:ला झोकून दिले. आणिबाणीत तुरुंगवासही भोगला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची डॉक्टरेट, मराठवाडा भूषण पुरस्कार ही त्यांच्या विद्वत्ता व सामाजिक कार्याची पावती होती.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
