अंजली मुळे
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००४
“मी बघा काहीतरी दुसरी-तिसरी शिकलेली. मला लिहिता येत नाही; पण मनीषाताई भेटल्या आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. मी वाचायला, सही करायला शिकले आणि ‘मासूम’ने तर मला डॉक्टरच करून टाकलं बघा.’मासूम’मधल्या नानी सांगत होत्या.
