Select Page

सतीश आळेकर

महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००४

सतीश आळेकरांच्या सात नाटकांमध्ये ‘पिढीजात’ हे सगळ्यात अलीकडचं आणि अतिशय महत्त्वाचं नाटक. आळेकरी शैलीची सर्ववैशिष्ट्यं घेऊन आलेलं हे नाटक महत्त्वाचं आहे याचं कारण ते एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलतं, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डिंडोरे न पिटता या पेचाला सहृदयतेनं सामोरं जातं, त्यातली गोची समजून घेतं आणि या काळातल्या ‘बाप’ पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचं न-नैतिक होणं दाखवतं.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे