शब्दवेध नितीन रिंढे
महाराष्ट्र फाउंडेशन नियतकालिक पुरस्कार – २००४
मार्च १९८७मध्ये ‘शब्दवेध’ या अनियतकालिकाचा पहिला अंक विदर्भातल्या मेहेकर गावी कवी ना. घ. देशपांडे यांच्या हस्ते, त्यांच्याच घरी प्रकाशित झाला, तेव्हा ते केवळ एक हौशी व गंभीर तरुण कवी-लेखकांनी पैसे जमवून सुरू केलेलं अनियतकालिक होतं
