आशा बगे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००५
आशा बगे या, १९७५ नंतरच्या पिढीतल्या, मराठी साहित्यक्षेत्रात स्वत:चा ठसा उटवणाऱ्या एक महत्त्वाच्या लेखिका आहेत. कथा व कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली आहे. ‘मनस्विनी’, ‘झुंबर’,’त्रिदल’ आणि ‘सेतू’ यांनंतरची, ‘भूमी’ ही त्यांची लक्षणीय कादंबरी आहे
