डॉ. अनंत फडके
महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार- २००६
डॉ. अनंत फडके गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत पूर्णपणे कार्यरत आहेत. लोकविज्ञान संघटना, मेडिको फ्रेंड सर्कल, सेहत, साथी, जनआरोग्य अभियान या व यासारख्या आरोग्यव्यवस्था निकोप व लोकाभिमुख व्हाव्या यासाठी झटणाऱ्या संस्था-संघटनांशी त्यांचे नाव अतूटपणे जोडले गेले आहे. तसे तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात प्रत्येकच व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते. परंतु या प्रवाहात सहभागी होतानाच जे आपली स्वत:ची वाट शोधतात, घडवतात, ते आपला वाटाही अधिक प्रभावीपणे उचलू शकतात.
