वाहरू सोनवणे
महाराष्ट्र फाउंडेशन व्यक्ती पुरस्कार- २००६
महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीमध्ये शहाद्याच्या आदिवासी चळवळीचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. जमीनदार, मालदार, शेतमालक यांच्या अनन्वित अत्याचाराच्या आणि पिळवणुकीच्या दडपणाखाली वर्षानुवर्ष पिचलेल्या सातपुड्याच्या डोंगररांगात व पायथ्याशी असलेल्या आदिवासींचा जोरदार लढा १९७०च्या दरम्यान सुरू झाला होता.
