अजय कांडर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७
अस्सल कवितेचा स्वर साहित्य विश्वात नेहमी श्रेष्ठ असतो. हा स्वर नेहमीच दुर्मीळ असतो. जेव्हा अचानक,कवितेचा हा स्वर कानावर येतो आणि जगण्याच्या लयीशी अनुबंध साधणाऱ्या त्या काव्यस्वरांशी आस्वाद पातळीवरून संवाद सुरू होतो, तेव्हा तो संवाद सबंध मानवी जीवनधारेलाच खळखळून घ्यायला लावतो ही वस्तुस्थिती आहे.
