पालकनीती
महाराष्ट्र फाउंडेशन नियतकालिक पुरस्कार– २००७
२००७ चे ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे परस्कार जाहीर झाले आणि त्यामधील नियतकालिक-अनियतकालिकांसाठी असा असलेला पुरस्कार ‘पालकनीती’ ह्या मासिकाला मिळाला, ही बातमी वाचनात आली. मनस्वी आनंद झाला.माझ्या आनंदाची कारणे तिहेरी स्वरूपाची होती. मध्यंतरी काही वर्षे ह्या मासिकात मी सलग दोन लेखमाला केल्यामुळे आपल्या ‘पालकनीती’ला पुरस्कार मिळाला हे कारण होतेच; पण त्याहूनही दुसरे कारण महत्त्वाचे होते. महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात दिले जातात
