आसाराम लोमटे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००८
‘इडा पीडा टळो’ या संग्रहात एकूण सहा कथा आहेत. सर्व कथा आजच्या ग्रामीण वास्तवाचे भीषण भयावह चित्र रेखाटतात. तिसरे अपत्य झाले तर योगायोगाने मिळालेले आपले सरपंचपद धोक्यात येईल म्हणून दोन मुलींचा बाप असणारा भगीरथ आपल्या बायकोवर गर्भपाताचे दडपण आणतो.
