प्रज्ञा लोखंडे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००८
साठीच्या दशकात मराठी कवितेने आशय-आविष्कारांच्या संदर्भात नवे रूप धारण केले. जीवनवास्तवाशी समांतर, किंबहुना सभोवतालचे जीवनवास्तवच प्रक्षेपित करणारी आशयसूत्रे आणि जीवनसंबद्ध, अनुभवसंबद्ध, प्रतिमा, प्रतीके आणि शब्दकळा यांच्याद्वारे साकार झालेली नवी काव्यशैली यांच्याबाबतीत मराठी कवितेने हे नवे रूप धारण केले होते.
