महाराष्ट्र फाऊंडेशन कृतज्ञता पुरस्कार २०१९-
राजेंद्र बहाळकर
राजेंद्र बहाळकर हे ‘छात्रभारती’चे एक संस्थापक सदस्य असून त्यांनी ‘छात्रभारती’ उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक म्हणून काम केलं आहे. धुळ्यात ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ केंद्रातही कार्यरत होते. सध्या ते हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिट्यूट येथे सचिव या नात्याने मुस्लीम समाजाशी संवाद आणि प्रबोधनाचं काम प्रामुख्याने करत आहेत. प्रशासकीय, आणि खास करून करप्रणाली, चॅरिटी कमिशनची कार्यपद्धती, याबद्दल त्यांचा अभ्यास आहे.‘जनसहयोग ट्रस्ट’, ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’, ‘शाश्वत विकास न्यास’ या आमच्या संस्थांचे ते विश्वस्त अथवा सल्लागार आहेत.


