Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार २०१९-
केरळ शास्त्र साहित्य परिषद

‘केरळ शास्त्र साहित्य परिषद’ ही केरळमधील शक्तिशाली स्वयंसेवी संघटना आहे. सध्या या संघटनेचे चाळीस हजार सभासद असून त्यांपैकी दहा हजार स्त्रिया आहेत. भारतात विज्ञान-प्रसाराची एवढी बलाढ्य संघटना दुसरी कुठली नसावी. ‘के.एस.एस.पी.’ या संक्षिप्त नावाने केरळमधील ही संस्था सर्व थरांतील लोकांना परिचित आहे.