महाराष्ट्र फाऊंडेशन कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार २०१९- शहाजी गडहिरे
सोलापूर जिल्ह्यातले शहाजी गडहिरे सुरुवातीला ‘परिवर्तन’ या संस्थेच्या प्रवाहात सामील झाले. कसलेही आग्रही आविर्भाव नसलेल्या संयत-मितभाषी स्वभावाला सांभाळतच शहाजीभाऊंनी भारतातील एका महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नावर; म्हणजे दलितांमधील भूमिहीनता या कळीच्या सामाजिक प्रश्नावर रचनात्मक काम उभं केलं. ‘आंबेडकर शेतीविकास संशोधन संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. भूमिहीन असोत, की दुष्काळाच्या झळा सोसणारे गरीब वंचित – या मंडळींमध्ये आत्मभान आणण्याचं कार्यच तर शहाजीभाऊ करत आले आहेत.