Select Page

महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य जीवनगौरव सन्मान २०२०- गजानन खातू

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मिळण्यासाठीच्या परिवर्तनाच्या चळवळींतील चैतन्यदायी स्रोत म्हणजे गजानन खातू! खातूभाईंच्या सामाजिक कामाची सुरुवात राष्ट्र सेवा दलातून झाली. पुढं खातूभाई ‘अपना बाजार’च्या सहकार चळवळीत उतरले. आणीबाणीत भाईंनी भूमिगत राहून चळवळीला मदत केली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं यासाठीच्या संघर्षलढ्यात भाई उतरले. एक गाव एक पाणवठा, नर्मदा बचाव आंदोलन, विषमता निर्मूलन परिषद यांसारख्या अनेक समताधिष्ठित चळवळीत खातूभाईंचा सहभाग लक्षणीय होता. साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय स्मारक खातूभाईंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी-लोक सहभागातून उभं राहिलं. खातूभाईंना भविष्याचा वेध घेणं अधिक आवडतं. ते त्यात रमतात. नवी माणसं जोडावीत, नवा विचार समजून घ्यावा, प्रश्नांना भिडत जावं, नव्याने मांडणी करावी, नवी माध्यमं अंगीकारावीत ही त्यांची खासियत आहे.