
महाबळेश्वर सैल
विशेष ग्रंथ पुरस्कार : तांडव (कादंबरी) पुरस्कार २०१५
कादंबरीकार
पत्ता –
संपर्क – मो. ९७६४०७२९०८
मराठी वाचकांना महाबळेश्वर सैल हे नाव परिचित झालं ते ‘तांडव’ या कादंबरीमुळे. गोव्यातील धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहिलेली आहे. धर्मांतरासारख्या अत्यंत संवेदनशील आणि ज्वालाग्रही विषयावरची ‘तांडव’ कादंबरी गोव्यातल्या धर्मांतरणाची कथा सांगत असली तरी ही कादंबरी कोठेही एकांगी किंवा धर्मांध न होता ‘ माणूसकी’ या एकमेव सच्च्या धर्माचे संकीर्तन करते. ‘ बळजबरीच्या धर्मांतराने मानवी अस्तित्व कसे विदीर्ण होते’ हा ‘ तांडव’ चा प्रमुख विषय आहे. सैल यांचे लिखाण त्यांच्या अनुभवांशी निगडित आहे. त्यांची मातृभाषा कोकणी. कोकणीत त्यांनी काळी गंगा, अदृष्ट, अरण्यकांड, युगसांवार आदी सरस कादंब-या लिहिल्या. केवळ कल्पकतेनं वा वास्तव सांगण्याच्या पध्दतीने न लिहिता ते प्रतिभा, निरीक्षण व संवेदना यांच्या प्रभावातून लिहितात, म्हणूनच मराठी व कोकणी या दोन्ही भाषेतील त्यांचे लेखन वाचकांना प्रत्ययकारी वाटते.