Select Page

संध्या नरे-पवार

साहित्य : वैचारिक ग्रंथ पुरस्कार 2014

पत्रकार , लेखिका
पत्ता –
संपर्क – मो. ९३२२२४४५०७

‘डाकीण एक अमानवी प्रथा’ या पूस्तकातून संध्या नरे-पवार यांनी आदिवासी महिलांवरील अत्याचाराची अत्यंत अस्वस्थ करणारी एक बाजू प्रभावीपणे वाचकांसमोर आणलेली आहे. आदिवासी समाजातील अत्यंत अघोरी अशा ‘डाकीण’ प्रथेवर याच नावाने त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या संवेदनशील व अभ्यासूवृत्तीचा परिचय देते. महाराष्ट्रातील नंदुरबार व ठाणे जिल्हयात आजही अस्तित्वात असलेल्या डाकीण प्रथेचा मागोवा घेताना संध्या नरे-पवार त्या एका अघोरी प्रथेच्या पलिकडे जाऊन समाजातील स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी आणि त्यांच्याशी एकूणच असलेले समाजाचे क्रुर वर्तन या वेध घेतात आणि त्यासंबंधी काही मूलगामी प्रश्न उपस्थित करतात. लहानपणी घरात वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांच्यातील पत्रकार-लेखक घडला. हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन अशा मिश्र वस्तीत त्यांचे बालपण गेले. संवेदनशील मनाला जाणवणारी अस्वस्थता, अशांतता आणि अस्वास्थ्यातून त्यांना संशोधनपर लेखनाची उर्मी त्यांना मिळाली. ‘तिची भाकरी कोणी चोरली?’ व ‘डाकीण एक अमानवी प्रथा’ या दोन पुस्तकांतून अनुक्रमे जातव्यवस्था आणि स्त्रियांचे समाजातील स्थान हे विषय त्यांनी प्रभावीपणे मांडले आहेत. .

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014 – संध्या नरे-पवार