
अमिता नायडू
साहित्य : अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार 2014 : प्लॅटफॉर्म नंबर झीरो
पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता –
संपर्क – मो. ९९२२४१०९५१
प्लॅटर्फार्मवरील मुलांचे जगण्याचे ‘प्लॅटफॉर्म झीरो’ हे पुस्तक लिहून अनिता नायडू यांनी रेल्वे स्टेशनवरील माहित नसलेली दुनिया वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. सामाजिक कार्याची आत्यंतिक ओढ त्यांना स्टेशनवरील बेवारस आयुष्य जगणा-या मुलांकडे घेऊन गेली. रोज स्टेशनवरील मुलांशी गप्पा मारत त्या त्या मुलांना बोलतं करायच्या. त्यातीनच त्यांना या पुस्तकाची प्रेरणा मिळाली. या मुलांचे जगणे, त्यांचा गुन्ह्यांसाठी आणि लैंगिक गोष्टींसाठी केला जाणारा वापर, त्यांचे कोमेजून गेलेले बालपण, अकाली प्रौढ आणि निबर बनलेले त्यांचे मन या साऱ्या गोष्टी पुस्तकात वाचताना आपणही अस्वस्थ होऊन जातो. ही मुले जगण्याच्या अस्थिरतेला तोंड देण्याची ताकत कशी आणि कुठून मिळवतात? कुणी उज्ज्वल भविष्यासाठी तर कुणी घरच्या वाईट परिस्थितीतून सुटका मिळवण्यासाठी म्हणून घरून पळून आलेला असतो. स्टँडवर, स्टेशनवर ही मुलं आसरा घेतात. त्यांच्या जगण्यातले धोके कमी करुन या मुलांनचेही भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी त्यांना सक्षम करण्याचे कार्य अनिता व त्यांच्यासारखे समाजकार्यकर्ते कसे करतात, याचे वास्तव ‘प्लॅटफॉर्म झीरो’ पुस्तकात आहे.