
अशोक पवार
साहित्य : ललित ग्रंथ पुरस्कार 2014 | पडझड
संपर्क – मो. ९८२३५६३७६५
भटक्यांच्या जीवनाला ख-या अर्थाने वाचा फोडणारे साहित्य अशोक पवार यांनी लिहिले आहे. याच परंपरेतील वेदनांना पोटतिडकीने उजागर करणारी त्यांची ‘पडझड’ ही कादंबरी आहे. अशोक पवार स्वत: वयाच्या पंचविशीपर्यंत पालावरच राहिले. पोटापायी बिराड घेउन दर कोस, दर मुक्काम यातनामय आयुष्य जगले. नशीबाने चुकुन शाळेशी धागा जुळल्याने थोडाफार अभ्यास ते करु शकले. पण जातपंचायतीनं बहिष्कृताचा शिक्का मारल्याने मजुरी करावी लागली. अशातच लागलेल्या वाचनाच्या वेडातून शाहू, फुले, आंबेडकर, कार्ल मार्क्स, गांधी मॅक्सिम गॉर्की, टॉलस्टॉय, चेकाव्ह वाचले. ‘पडझड’ कादंबरीतून वडार या भटक्या विमुक्तांची व्यथा-वेदना पवार यांनी प्रभावीपणे मांडली आहे. आजच्या बेरोजगार युवकांचे प्रतिबिंबही कादंबरीत जाणवते. त्यांचे ‘बिराड’ हे आत्मकथन तर ‘इळनमाळ’, ‘दर कोस’, ‘दर मुक्काम’, ‘तसव्या’ आणि ‘पडझड’ हे लेखन कादंब-यांच्या रुपाने मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे.