Select Page

मकरंद साठे

साहित्य : रा. शं. दातार विशेष नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीच्या तीस रात्री : 2014

नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ९८२२०४२१७२

मकरंद साठे यांचे हे महत्त्वाचे पुस्तक. ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री.’मराठी रंगभूमीचा राजकीय आणि सामाजिक इतिहास त्यांनी ललित अंगाने तीन खंडांत आपल्यासमोर सादर केलेला आहे. साठे यांनी या ग्रंथांत मराठी नाट्य-परंपरेच्या श्रीमंती आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा वेध घेताना त्यातील उपेक्षित, दुर्लक्षित पण महत्त्वाच्या प्रवाहांनाही या ग्रंथात स्थान दिले आहे. सामाजिक, वैचारिक, राजकीय, जागतिक संदर्भाची दखल आपल्या नाटकातून व्यक्त करणारे आजच्या पिढीतील महत्त्वाचे नाटककार अशी मकरंद साठे यांची ओळख आहे. ‘सापत्नकराचे मूल’, ‘ठोंब्या’, ‘गोळायुग’, ‘चौक’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘एैसपैस सोयीचा बैस’, ‘दलपतसिंग येती गावा’ अशी नाटके त्यांनी लिहिली. साठे यांच्या लेखनात तत्त्वज्ञान असले तरी ते स्वतंत्र शैलीत प्रकटते. वैचारिक मांडणी करणारी नाटके हे साठे यांचे वैशिष्टय आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- मकरंद साठे