Select Page

जयंत नारळीकर

साहित्य : जीवनगौरव पुरस्कार 2013

खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक
पत्ता –
संपर्क – फोन ०२० २५८८११५०

महाराष्ट्रफाउंडेशनने डॉ. जयंत नारळीकर यांचा ललित लेखन व विज्ञान प्रसार यांसाठी हा गौरव पुरस्कार दिलेला आहे. त्यांची खगोलभौतिकी क्षेत्रातील कामगिरी देश-परदेशात प्रसिद्ध आहे,ती सर्वांना ठाऊकच आहे.पण विज्ञान प्रसाराचे महत्त्व जाणून नारळीकरांनी सामान्यांना समजेल अशा भाषेत इंग्रजी, मराठी, हिंदीत विपुल लेखन केलेले आहे. शंभराहून अधिक संख्या असलेल्या या पुस्तकात ‘यक्षाची देणगी’, ‘अंतराळातील भस्मासूर’ असे कथासंग्रह, ‘प्रेषित’, ‘वामन परत न आाला’, ‘अभयारण्य’ अशा कादंब-या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. ‘चार नगरातील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाला ‘ साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळालेला आहे. १९७४ पासून सातत्याने त्यांनी संशोधनातून मुद्दाम वेळ काढून ललित लेखन केले, काही ग्रंथांचे संपादनही केले. अंधश्रध्दा , फलज्योतिष, वास्तुशास्त्र, बुवाबाजी अशा अनिष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विज्ञान प्रसाराबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्यही त्यांनी त्यांच्या लिखाणातून केले. विज्ञान कथेला आधुनिक बनवण्याचे, तिला प्रतिष्ठा देण्याचे कार्य डॉ. नारळीकर यांनी केले. प्रा. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली नारळीकरांनी केवळ पीएच. डी. चे संशोधनच केले नाही तर त्यांच्यातील ललित-विज्ञान लेखनाचा गुणही घेतला. फ्रेड हॉएल यांच्याबरोबर संशोधनासोबतच नारळीकरांनी दोनशेहून अधिक संशोधनात्मक निबंध लिहिले. केंब्रिजचे किंग्ज कॉलेज, भारतातील टाटा मूलभूत संशोधन केंद्र तर पुण्यातील आयुका या संस्थांमध्ये नारळीकरांचे संशोधन कार्य अविरत चालू होते.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- जयंत नारळीकर