समाजकार्य विशेष पुरस्कार (दलित आणि भूमिहीनांच्या हक्कांसाठी केलेले कार्य) २०२२
शांताराम पंदेरे (औरंगाबाद)
एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे
औरंगाबादचे ६९ वर्षांचे शांताराम पंदेरे यांची खरी ओळख म्हणजे गेल्या ३५ वर्षापासून दलित, भिल-ठाकर-पारधी आदीवासी, भटके-विमुक्त व महिलांवरील अत्याचार विरोधात लढा. आदिवासी, दलीत, भटके-विमुक्त समाजातील शेकडो कुटूंबांतील स्त्री-पुरूषांच्या नावावर गायरान, वन जमीन हक्क मिळविण्याच्या चळवळीत सहभाग. “लोकपर्याय” या संघटनेच्या वतीने ३५ वर्षांची अथक चळवळ, ७३ व्या घटना दुरूस्तीनुसार खास महिला ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले.