Select Page

समाजकार्य विशेष पुरस्कार (विधवा प्रथा निर्मूलनाचे कार्य केल्याबाबत) २०२२
प्रमोद झिंजाडे (करमाळा, सोलापूर)
एक लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे प्रमोद झिंजाडे हे करमाळ्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ या नावाने एनजीओ १९८२ साली स्थापन केली. अन्याय, अत्याचार रोखला आहे आणि न्याय प्रस्थापित केला आहे. प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. प्रमोद झिंजाडे यांनी त्यांच्या पश्चयात स्वत:च्या पत्नीने कुठलेही विधवेचे अनिष्ट नियम पाळू नयेत आणि त्यांच्यावर कोणी लादू नयेत म्हणून लग्नाच्या ४४ वर्षांनंतर हा निर्णय बॉन्ड पेपर वर लिहून ठेवला आहे.