Select Page

ग्रंथ पुरस्कार (वैचारिक/ अपारंपरिक) माणूस ‘असं का वागतो?’ २०२४ –
अंजली चिपलकट्टी, पुणे
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

माणसाच्या (तुमच्या-आमच्या)विचारात आणि प्रत्यक्ष वागण्यात जी तफावत वेळोवेळी दिसून येते, तिच्यासंबंधी अतिशय विचक्षणपणाने केलेले हे विवेचन आहे.लेखिकेचे वाचन दांडगे, चिंतन-मनन त्याहून मौलिक आणि लेखन अतिशय सरळ, वाचनीय, अजिबात बोजड नसलेले आहे. या पुस्तकात समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, आत्मज्ञान, तत्वज्ञान, राजकारणासंबंधी तत्वज्ञान, बोलिभाषा आणि लिखितभाषा अंगाने मानवी वर्तावर लेखिकेने भाष्य केलेले आहे.भारतातील अनेक विषयांतील विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार करण्यासाठी आपल्यालादेखील हे लिखाण फार उपयुक्त आहे, संग्राह्य आहे.