Select Page

कुमार केतकर

ग्रंथ पुरस्कार 2010 : वैचारिक

पत्रकार, संपादक, लेखक
पत्ता – २९/६, इुंडीवाला अपार्टमेंट, सिध्दार्थ टॉवर समोर, कोपरी, ठाणे पूर्व ४०० ६०३
संपर्क – मो. ९८२१५२४१३१

तीन दशकांहून अधिक काळ इंग्रजी व मराठी पत्रकारितेत वावरणारे बहुआयामी व्यक्तीमत्त्व म्हणजे कुमार केतकर. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, दिव्यमराठी या दैनिकांचे संपादकपद त्यांनी भूषविले. ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’, ‘कथा स्वातंत्र्याची’, ‘विसाव्या शतकाचे महानिर्वाण’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘ओसलेले वादळ’, ‘मोनालिसाचे स्मित’, ‘विश्वामित्राचे जग’, ‘बदलते विश्व’ अशा पुस्तकांमधील त्यांचे लेखन हे नैतिकता, समाजसन्मुखता दर्शविते. त्यांच्या ‘बदलते विश्व’ या पुरस्कार प्राप्त पुस्तकातील वैचारिक निबंध प्रखर वास्तवाचे भान करून देतानाच नैतिकता, समाजसन्मुखता, धर्मनिरपेक्षता व विश्वात्मकता यांच्या दिशेने प्रवास करण्याची प्रेरणा देतात. वृत्तपत्रातूनही संपादक या नात्याने लिहिलेले सहा ते सात हजाराहून अधिक अग्रलेख असा त्यांचा लेखन आवाका आहे. कार्ल मार्क्स, म. गांधी, बट्रॉड रसेल व जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक या चारही दृष्टिकोनातून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षातून कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची वृत्ती त्यांनी अंगी बाणवली आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2010- कुमार केतकर