Select Page

भीम रासकर

कार्यकर्ता पुरस्कार २०१५-२०१६ – प्रबोधन

भीम रासकर महिला राजसत्ता आंदोलनामुळे अधिक ओळखले जातात. ‘धारावी प्रशिक्षण केंद्रा’चा ‘व्होकेशनल ट्रेनिंग ऑफिसर म्हणून कार्य करत असतानाच रासकर यांनी ‘श्रमिक विद्यापीठा’ची स्थापना केली. शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या अनौपचारिक शिक्षणसंकल्पनेवर आधारित त्यांनी पेंटिंग, सुतारकाम, वॉल पेंटिंग, सहायक वायरमन हे अभ्यासक्रम ‘असंघटित कामगारां’साठी सुरू केले. ‘महिलांसाठी कार्यात्मक साक्षरता’ हा त्यांचा अब्यासक्रम तर खूप गाजला. राष्ट्रीय साक्षरता प्रसाराबरोबरच संघटनाबांधणी आणि व्यवस्थापन कौशल्य याचाही प्रसार त्यांनी केला. २००० साली सुरू केलेल्या ‘महिला राजसत्ता आंदोलना’तून महिलांच्या निर्णयप्रक्रियेतील सजग सहभागाला त्यांनी राजकारणाच्या केंद्स्थानी आणले. रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट – आर.एस.सी.डी.चे भीम रासकर हे खंदे आधार बनले. २०००० सदस्य, ६०० गावशाखा, २००० राजकारणींची पंचायत आघाडी असलेल्या १०० नेतृत्वशाली महिलांच्या टीमचे भीमराव रासकर हे प्रमुख आधारस्तंभ आहेत.

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१५-२०१६- भीम रासकर