Select Page

रंगनाथ पठारे

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९४ 

मराठी कादंबरीच्या क्षेत्रात अलिकडच्या काळात ‘तुंबाडचे खोत’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कादंब-या विषय व आकारमान यामुळे लक्ष वेधून घेणा-या ठरल्या. ‘ताम्रपट’ ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी त्यापैकीच एक. वरवर पाहाता ताम्रपट’ चे स्वरूप हरिभाऊ आपटे, श्रीधर । व्यंकटेश केतकर किंवा अलिकडील ग. प्र. प्रधानांच्या ‘साता उत्तराची कहाणी’ यांसारख्या कादंब-यांची आठवण करुन देणारे असे ऐसपैस आहे. अनेकानेक व्यक्तिरेखा उभ्या करुन भरघोस जीवनानुभव प्रकट करणारे, सविस्तर – कधी कधी पाल्हाळिक वाटणारे – निवेदन हे । नामपट’ चे समकालीन कादंबरीपेक्षा वेगळे वाटणारे वैशिष्ट्यही तिला स्वातंत्र्यपूर्व काळातील कादंबरीच्या जवळ नेणारे आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ – रंगनाथ पठारे