
हसेन जमादार
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९४
६ डिसेंबर १९९३ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. दोन्ही धर्मातील अनुयायांनी एकमेकांची घरेदारे जाळली. रक्ताचे पाट वाहिले. कविवर्य केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे ‘नरेचि केला हीन किती नर’ अशी अवस्था निर्माण झाली. ह्या पार्श्वभमीवर ह्याच काळात हसेन जमादार यांचे ‘जिहाद’ हे पुस्तक मानसन्मान ह्या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले. पुस्तकाचे नाव ‘जिहाद’ आणि तेही एका मुसलमान लेखकाने लिहिलेले ! त्यामुळे आधीच्या आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार काहींना वाटण्याची शक्यता, पण लेखकाने पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जाड टाईपात कुराणाचा हवाला देऊन आपणास भावलेला अर्थ देवनागरीत दिला आहे.
अंकातील मुलाखत वाचा…
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ – हसेन जमादार