अभय कांता
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००४
आणीबाणी जाहीर होण्यापूर्वीचा काळ. देशात बरीच खळबळ सुरू होती. दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, शासकीय अंदाधुंदी, तत्त्वशून्य सत्ताभिलाषा या सर्व अपप्रवृत्तींना ऊत आला होता. रेल्वे कामगार संपासह अनेक क्षेत्रांत कामगार चळवळ धडका मारत होती तरी समाजपरिवर्तनाच्या व्यापक ध्येयाशी तिचा सांधा जुळत नव्हता. यातून येणारे आर्थिक यशही अपुरे होते. डावी चळवळ वैचारिक-राजकीय मतभेदांमुळे दुभंगलेली होती
