
अचला जोशी
विशेष ग्रंथ पुरस्कार 2012
व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका
पत्ता – ११, आसावरी-सी, वीर सावरकर मार्ग, माहिम, मुंबई ४०० ०१६
संपर्क – मो. ९३२२७९०३३३
व्यवसाय, शिक्षण, समाजकार्य अशा क्षेत्रात अचला जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबईतील श्रध्दानंद आश्रमात हजारो अनाथ मुलांना आणि अभागी, परित्यक्त्या स्त्रियांना आसरा देणा-या या आश्रमाचा इतिहास, ‘आश्रम नावाचे घर’ हे पुस्तक आहे. अचला जोशी यांनी आपली आई मनोरमा फडके यांचे श्रध्दानंद आश्रमाचे काम आपले स्वतःचे जीवित कार्य असावे अशा निष्ठेने सांभाळाले. हे करत असताना पुरुषी अत्याचारांनी पोळलेल्या स्त्रिया, त्यांची मुले अशा निराश्रीत जीवांना आशेचा किरण दाखविला. याच श्रध्दानंद आश्रमाच्या ऐंशी वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आश्रमातील मुलांना दत्तक देताना, मोठे झालेल्यांचे लग्नविधी करताना मुलींना बाळंतपणाला आणलं जातं तेव्हाच्या आश्रमवासियांच्या नेमक्या काय भावना असतात, याचे मनोरम दर्शन या ग्रंथात घडते. तेथील कौटुंबिक सोहळ्यांमध्ये एकमेकांच्या सुख-दु:खात समरसून जाणा-या माणसांच्या भावनांचे कंगोरे अचला जोशी यांनी नेकमेपणाने टिपले आहेत.