महाराष्ट्रातील प्रबोधनाचा वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार – २००६
बाबासाहेब आंबेडकर अकादमीची स्थापना ७ जून १९९२ रोजी सातारा येथे झाली. सामाजिक परिवर्तनाला पूरक प्रबोधन, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि सामाजिक राजकीय प्रश्नांवर संशोधन ही प्रमुख उद्दिष्टे अकादमीच्या स्थापनेमागे होती. १९८० पासून भारतीय समाजात वाढत असलेल्या प्रतिगामी राजकारणाला अटकाव करण्याची निकड जाणवूनच आंबेडकर अकादमीच्या स्थापनेचा विचार पुढे आला होता.
