
आनंद विंगकर
साहित्य : ललित ग्रंथ पुरस्कार 2013
कवी, कादंबरीकार, सामाजिक कार्यकर्ता
पत्ता – विंग, ता. कराड, जिल्हा सातारा
संपर्क – मो. ९८२३१५५७६८
कवी अशी ओळख असलेल्या आनंद विंगकर यांना चळवळींची पार्श्वभूमी आहे. शेतकरी आत्महत्या या विषयावर कविता लिहिण्याचा प्रयत्न करीत असताना‘ हा विषय कवितेपेक्षा कादंबरीतून अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करु शकता येईल’ असे त्यांना वाटले. यातूनच गावकुसाशी घट्ट नाते सांगणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी लिहिली गेली. अवघ्या सहा दिवसातल्या घटना-घडामोडीं विषयी ही कादंबरीआहे. दारिद्रय, निसर्गाची अवकृपा या कचाटयात सापडलेल्या समूहाची ही कहाणी आहे. पश्चाताप व पराकोटीचा ताण यातून पोटच्या तीन मुलींना मागे ठेवून यशवंत आणि पार्वती आत्महत्या करतात. अशी ही विदारक कहाणी आहे. पण या दुष्टचक्रातही तगून राहणा-या माणसांच्या चिवट व झुंजार जीवनप्रेरणांचा आविष्कारही कादंबरीत प्रत्ययकारी रितीने मांडला आहे. ‘आत्मटीकेच्या उदास रात्री’ आणि ‘सुंबरान मांडलं’ हे त्यांचे कविता-संग्रहही प्रसिद्ध आहेत.