Select Page

ग्रंथ पुरस्कार (ललित) २०२२
अनिल साबळे, मंचर-
‘पिवळा पिवळा पाचोळा’ (कथासंग्रह)

पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा अनिल साबळेंचा कथासंग्रह त्यांच्या आत्मानुभवामुळे आणि बालकाचे निरागस भावविश्व रेखाटण्यामुळे अत्यंत वजनदार झालेला आहे. नागरी जीवनापासून वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं निसर्गाच्या सान्निध्यातलं जनजीवन आपल्याला प्राकृतिक सौंदर्य आणि सामर्थ्य यांच्या अधिक जवळ नेते. त्यामुळे या लेखनाला डूब प्राप्त झालेली आहे. रानातील, आदिवासी विभागातील जीवनचित्रणामुळे सदर लेखन अत्यंत वास्तवदर्शी आणि तितकेच पारदर्शीही झालेले आहे. त्यांचे जंगलाशी असलेले अतूट नाते त्यांच्या सर्व लेखनातून प्रभावीपणे व्यक्त होते.