
अनिलकुमार साळवे
रा.शं. दातार नाट्य पुरस्कार २०१६
प्राध्यापक, नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ८३०८९०५२२९
औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात नाट्यशास्त्र शिकविणा-या अनिलकुमार साळवे यांच्या पुरस्कार प्राप्त तीन एकांकिका म्हणजे ‘ग्लोबल आडगाव’, ‘शेख मुहम्मद : मराठी माध्यम’, ‘तिच्यासाठी वाट्टेल ते!’. शहरीकरणात खेडयांचे काय होते हे दाखविणारी एकांकिका – ‘ग्लोबल आडगाव‘. दहशतवादी हल्ला होतो तेंव्हा खेडयातील मुस्लिामांकडे कसे पाहिले जाते हे सांगणाारी एकांकिका – ‘शेख मुहम्मद : मराठी माध्यम.’ तर पदवी घेउनही नोकरीच्या बाजारात फिरणारी तरुणी आपल्याला त्यांच्या ‘तिच्यासाठी वाट्टेल ते !’ या एकांकिकेमध्ये भेटते आणि अस्वस्थ करते. या तीनही एकांकिका आजच्या परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवतात. जवळपास ३० एकांकिका, ‘कथा खैरलांजीची’, ‘ओयासिस’ अशा नाटकांचे प्रयोग, लघुपटांचे लेखन व दिग्दर्शन असे सतत कामात व्यग्र असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिलकुमार साळवे. ग्रामीण जीवनातील विस्कटलेपण दाखवत, तळातल्यांची कैफियत मांडणारा हा मनस्वी नाटककार आहे.
साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
